देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूजमध्ये आयोजित शिबिरात ७५ जणांचे रक्तदान
अकलूज, – राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी अकलूजच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ७५ जणांनी रक्तदान केले.
अकलूज येथील शंकरराव मोहिते-पाटील रक्तपेढी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, भाजपा नेते धैर्यशील मोहिते-पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, डॉ. भषण दोशी, मुख्तार कोरबु, महादेव कावळे, बाळासाहेब वायकर उपस्थित होते.
सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात राज्यात व सोलापूर जिल्ह्यात श रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या बरोबरच हा संसर्गजन्य रोग संपूर्ण भारतात फैलावत आहे. कोरानात्रसंसर्गामुळे सर्वत्रच रक्तदान शिबिरांचे आयोजन अगदी कमी होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा निर्माण झाला
आहे. इतर सर्व गोष्टींना पर्याय आहे पण रक्ताला पर्याय नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून या संकटकालीन परिस्थितीमध्ये रक्तदान करून देशसेवा करावी या उदात्त हेतुने रक्तदान शिबिर आयोजित केल्याची माहिती धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिली.