पंढरपूर सिंहगड महाविद्यालाच्या स्थापत्य अभियांत्रिकी वेबिनारला चांगला प्रतिसाद
पंढरपूर – कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने अॅडव्हान्सेस इन सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयावर वेबिनार आयोजित केला होता. यास चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी मधील आधुनिकता आणि प्रगत तंत्रज्ञान या विषयावर ऑनलाइन व्याख्यानमाला दिनांक २६ ते २९ जुलै २०२० दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या वेबिनारला विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच इंडस्ट्रितील कर्मचा-यांनी सहभाग नोंदवला. या व्याख्यानमालेत स्थापत्य अभियांत्रिकी मधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
या वेबिनार मध्ये अनुक्रमे स्ट्रक्चरल इंजिनिअर प्रा. अमोल क्षीरसागर यांचे “मॉडेलिंग अँड ऍनालिसीस ऑफ स्ट्रक्चर्स युजिंग स्टॅड्-प्रो”, स्ट्रक्चरल इंजिनिअर प्रा. तेजोमय भोसले यांचे “एन ओवरव्ह्यू ऑन ई- टॅब”, डॉ. एन. जे. साठे यांचे “रोल ऑफ जिओलॉजी इन मेजर सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स”, डॉ. एस. टी. माळी यांचे “एडव्हांसेस इन मुन्सिपल सॉलिड वेस्ट मॅनजमेंट”, अशा विविध विषयावर व्याख्याने संपन्न झाली.
या ऑनलाईन वेबिनार मध्ये सहभागी तज्ज्ञांचे स्वागत आणि प्रास्ताविक प्रा. संगमनाथ उप्पीन, प्रा. एम. बी. शिंदे आणि प्रा. गणेश लकडे यांनी केले.
हे वेबिनार यशस्वी करण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्रा. एम. बी. शिंदे आणि प्रा. गणेश लकडे यांनी व्याख्यानमालेचे समन्वयक म्हणून काम पाहिले.
हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या प्रेरणेतून आणि विभाग प्रमुख डॉ. चेतन पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या वेबिनारसाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.