सोमवारी सोलापूर शहरात नवे 38 रुग्ण: आजवर 4065 झाले बरे ; सध्या 1012 जणांवर उपचार सुरू
सोलापूर– शहरात सोमवारी 10 ऑगस्टच्या अहवालानुसार नवे 38 रूग्ण आढळून आले आहेत. येथील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 460 इतकी झाली आहे. आज कोरोनामुळे 3 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर 130 जणांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे सोलापूर शहरातील रुग्ण संख्या कमी होत आहे. मात्र सध्या ग्रामीण भागात विविध तालुक्यात चाचण्या वाढल्याने तेथील कोरोनाबाधितांची संख्या शहरापेक्षा जास्त म्हणजे 5902 इतकी आहे.
सोलापूर महापालिकाक्षेत्रात आजवर 5 हजार 460 रूग्ण आढळून आले असून यापैकी 383 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचार सुरू असणारे 1 हजार 012 रूग्ण असून 4 हजार 065 जण उपचारानंतर घरी परतले आहे.
रविवारी एकूण 480 अहवाल मिळाले असून यापैकी 442 निगेटिव्ह आहे तर 38 पॉझिटिव्ह आहेत. आज 130 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.