शुक्रवारी पंढरपूर तालुक्यात 126 रुग्ण वाढले
पंढरपूर – शुक्रवार 14 आँगस्ट रोजी पंढरपूर शहर व तालुक्यात 126 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.
आजच्या अहवालानुसार शहरात 82 तर ग्रामीण भागात 44 रूग्ण आढळले आहेत. पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1577 झाली असून 588 जण उपचार घेवून घरी गेले आहेत तर 969 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. एकूण 28 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.
आजच्या अहवालानुसार ग्रामीण भागात आढीव 1, बादलकोट 1, भोसे 2, गादेगाव 2, गोपाळपूर 3, गुरसाळे 2, करकंब 3, करोळे 1, कासेगाव 1, वाखरी 1, कौठाळी 12, खर्डी 1, ल.टाकळी 2, मेंढापूर 1, मुंढेवाडी 1, रांझणी 1, रोपळे 2, सरकोली 2, उंबरे पागे 1, तुंगत 4. असे रुग्ण आढळले आहेत.