गुरुवारी पंढरपूर शहरात 44 तर ग्रामीण मध्ये 55 असे एकूण 99 रुग्ण वाढले
पंढरपूर – गुरुवारी 20 आँगस्ट रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 44 व तालुक्यात 55 असे 99 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.
पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार झाली आहे. आजच्या अहवालानुसार 2 जण मरण पावले आहेत. यामुळे कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 37 झाली आहे.
एकूण ११३१ रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर ८३२ जण कोरोना मधून बरे झाले आहेत व एकूण ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.