शनिवारच्या अहवालानुसार पंढरपूर तालुक्यात 60 कोरोना रुग्ण वाढले
पंढरपूर – शनिवारी 22 आँगस्ट रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 42 व तालुक्यात 18 असे 60 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.
पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 095 झाली आहे. आज कोरोनामुळे 1 जण मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 38 आहे.
एकूण 635 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 1337 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .