सोमवारी सोलापूर ग्रामीणमध्ये 260 रुग्ण वाढले, 207 जणांना डिसचार्ज
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) सोमवारी 24 आँगस्ट रोजी एकूण 260 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 83 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 207 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. सोमवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 8 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 9716 इतकी झाली असून यापैकी 6844 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 2597 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 207 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 275 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 9 जण मयत आहेत. आज 932 चाचण्या झाल्या यात 672अहवाल निगेटिव्ह आहेत तर 260 पॉझिटिव्ह आहेत.
शुक्रवार अहवालानुसार तालुकानिहाय पॉझिटिव्ह सापडलेले नवे रूग्ण पुढीलप्रमाणे – अक्कलकोट 7, बार्शी 44, करमाळा 5, माढा 25, माळशिरस 24, मंगळवेढा 4, मोहोळ 10, उत्तर सोलापूर 7, पंढरपूर 83, सांगोला 18तर दक्षिण सोलापूर 33.