तीर्थक्षेत्र पंढरीला दोन दिवसाआड पाणीपुरवठा, बंधार्यात साठा कमी
पंढरपूर- तीर्थक्षेत्र पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधार्यात पाणी साठा कमी असल्याने 12 मार्च पासून दोन दिवसाआड नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. पंढरपूर, सांगोला, शिरभावी योजनेसाठी पंढरीत भीमा नदीवर बंधारा बांधण्यात आला आहे. यंदा कमी पाऊस झाल्याने यातील पाण्याचा उपसा सिंचनासाठी ही जास्त आहे. उजनीतून भीमेत जानेवारी महिन्यात पाणी सोडण्यात आले होते. संभाव्य पाणी टंचाई पाहता पालिकेने यापूर्वीच शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरु केला आहे. आता मंगळवार पासून 2 दिवसाआड पाणीपुरवठा होईल. सोमवार 11 मार्च ला पाणी सोडले जाईल यानंतर गुरुवारीच पाणी येईल.