गुरूवारी सोलापूर ग्रामीणमध्ये 384 कोरोना रूग्ण, एकूण संख्या 12509
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) बगुरूवारी 3 सप्टेंबर रोजी एकूण 384 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 103 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 135 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. गुरूवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 11 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 12509 इतकी झाली असून यापैकी 8801 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 3348 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 135 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 360 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 11 जण मयत आहेत.
बुधवार च्या अहवालानुसार तालुकानिहाय पॉझिटिव्ह सापडलेले नवे रूग्ण पुढीलप्रमाणे – अक्कलकोट 2, बार्शी 89, करमाळा 32, माढा 48, माळशिरस 61, मंगळवेढा 21, मोहोळ 2, उत्तर सोलापूर 0, पंढरपूर 103, सांगोला 16, तर दक्षिण सोलापूर 10.

आहेत .