प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनला २१ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
पंढरपूर: कोरोना महामारीमुळे प्रशासकीय यंत्रणेकडून प्रमाणपत्रे मिळण्यास झालेला विलंब पाहता अनेक जण अजून प्रवेश प्रक्रियेपासून वंचित आहेत. याचा विचार करून प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी शासनाने आणखी एकदा मुदत वाढ दिली आहे.
‘महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई म्हणजेच एम.एस.बी.टी.ई. मार्फत चालवल्या जाणाऱ्या दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनसाठी आणखी एकदा मुदत वाढ मिळाली असून विद्यार्थ्यांना आता दि. २१ सप्टेंबर २०२० अखेरपर्यंत आपले ऑनलाईन अर्ज डीटीईच्या वेबसाईटवरून भरता येणार आहेत. या अगोदर रजिस्ट्रेशन करण्याची मुदत २५ ऑगस्ट पर्यंतच दिली होती. त्यात वाढ करून ०४ सप्टेंबर दिली होती त्यात आणखी वाढ केली असून विद्यार्थ्यांना आता २१ सप्टेंबर पर्यंत मुदत दिल्याने इंजिनिअरिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी संधी मिळणार आहे.’ अशी माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (पॉलिटेक्निक) पंढरपूरचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली.
यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावरती दि.२४ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.जर प्रवेश अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर त्याची दुरुस्ती दि.२५ ते २७ सप्टेंबर या दरम्यान करता येईल. यानंतर विद्यार्थ्यांना अंतिम गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावर दि. २९ सप्टेंबर रोजी पाहता येईल. प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पडताळणी करून रजिस्ट्रेशन करता येणार आहे. मागील वर्षी राज्यातील केवळ चार डिप्लोमा कॉलेजमध्येच १०० टक्के ऍडमिशन झाले होते. खाजगी महाविद्यालयांमध्ये १०० टक्के ऍडमिशन होणारे स्वेरीचे डिप्लोमा कॉलेज हे राज्यातील एकमेव कॉलेज ठरले. यंदाही स्वेरी कॉलेजला पालकांनी व विद्यार्थ्यांनी पहिली पसंती दिली आहे. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली सुविधा केंद्राचे कामकाज सुरु आहे. या अनुषंगाने सुविधा केंद्रावर पालकांची व विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी पहावयास मिळते आहे. या मुदतवाढीचा लाभ दहावी उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी तसेच अजून ज्यांना डिप्लोमा अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे परंतु अद्याप ज्यांनी रजिस्ट्रेशन केले नाही त्यांना घेता येणार आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. डिप्लोमा प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा. एस. एस. गायकवाड- मोबा.क्र. ९८९०५६६२८१ यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डिप्लोमा फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.