सोलापूर ग्रामीणमध्ये सोमवारी 519 रूग्ण वाढले, 374 जण झाले कोरोनामुक्त
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाकाक्षेत्र वगळून) सोमवारी 14 सप्टेंबर रोजी एकूण 519 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 133 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 374 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 10 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 17858 इतकी झाली असून यापैकी 11313 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 6041 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 374 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 504 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 10 जण मयत आहेत.