मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या सोलापूर जिल्हा बंदला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरपूर शहरासह ग्रामीण भागात सोमवारी २१ सप्टेंबर रोजी बंद पाळण्यात आला.

पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विविध राजकीय पक्ष,संघटनांचे पदाधिकारी यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. येथे सकाळी आरक्षणाच्या मागणीसाठी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले होते.

पंढरपूर तालुक्यात पिराची कुरोली येथे पुणे महामार्गावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

अक्कलकोट तालुक्यात बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातही दुकाने बंद होती.

सोलापूर शहरात आसूड आंदोलन करण्यात आले.

पंढरपूरमध्ये प्रांताधिकारी सचिन ढोले यांना मराठा आरक्षणाबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार भारत भालके उपस्थित होते.

सोलापूर येथे भाजप आमदार व माजी मंत्री सुभाष देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

मोहोळ येथे आमदार यशवंत माने यांनी निवेद स्वीकारले.

सोलापूर आमदार प्रणिती शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

सोलापूरमध्ये बंदला प्रतिसाद

करमाळा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

अक्कलकोट.

बार्शी येथे निवेदन स्वीकारताना आमदार राजेंद्र राऊत

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी सोलापूर जिल्हा बंदची हाक दिल्याने राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद ठेवण्यात आली होती. पंढरपूर बसस्थानकाचे छायाचित्र.

पंढरपूर- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून सर्वत्र मराठा संघटनांचे आंदोलन सुरु आहे. या मराठा आरक्षण स्थगिती विरोधात सोमवारी 21 सप्टेंबर ला सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. सोलापूर शहरासह तालुक्यांमध्ये यास चांगला प्रतिसाद मिळाला.
बंद काळात 21 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजून 01 मिनिटांपासून ते 21 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!