सोलापूर ग्रामीणमध्ये सोमवारी 472 रुग्ण वाढले तर 531 कोरोनामुक्त झाले
सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाकाक्षेत्र वगळून) सोमवारी 21 सप्टेंबर रोजी एकूण 472 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 98 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 531 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 15 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 21356 इतकी झाली असून यापैकी 13902 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 6867 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 531 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 587 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 15 जण मयत आहेत.