सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये बुधवारी 454 रुग्ण वाढले तर 16 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले
सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) बुधवारी 23 सप्टेंबर रोजी एकूण 454 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 150 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 404 जणांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 16 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 22167 इतकी झाली असून यापैकी 14575 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 6974 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 404 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 618 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 16 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 75 रुग्ण वाढले
पंढरपूर – बुधवारी 23 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 20 व तालुक्यात 55 असे 75 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 382 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 4 जण या आजारामुळे मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 108 झाली आहे.एकूण 1053 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 3221 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .