उजनीत येणारी पाण्याची आवक वाढली, संध्याकाळी धरण टक्केवारीच्या पन्नाशीत येणार
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असणारे उजनी धरण शनिवारी रात्रीपर्यंत उपयुक्त पातळीत पन्नास टक्के भरले जाईल. सकाळी या प्रकल्पात 48.40 टक्के पाणीसाठा होता तर दौंडची आवक वाढून 11 हजार 945 क्युसेक इतकी झाली आहे.उजनी प्रकल्पात मागील दोन महिन्यात जवळपास सत्तर टक्के पाणी आले आहे. हे धरण 2 जून 2021 रोजी वजा 22.42 टक्के होते ते आता उपयुक्त पातळीत 48 टक्के भरले आहे. मागील काही तासात उजनी येणारी आवक वाढू लागली आहे. काल दहा हजार क्युसेकचा विसर्ग दौंडजवळ मिळत होता. यात दोन हजाराने वाढ झाली आहे. यामुळे प्रकल्प आता संध्याकाळी टक्केवारीची पन्नासी गाठणार हे निश्चित आहे.