पंढरपूर – तालुक्यातील युवा नेते आणि धाराशिव साखर कारखाना युनिट 1,2,3 चे चेअरमन व ज्यांनी कोविडकाळात अल्पावधीत साखर कारखान्यात देशातील पहिला ऑक्सिजन प्लांट उभारला त्या अभिजीत धनंजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी रक्तदान, नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर यासह अन्नदान, गरजू लोकांना किराणा किट वाटप, वृक्षारोपण, कोविड योद्धाचा सन्मान अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 502 जणांनी रक्तदान केले.
अनावश्यक खर्च टाळून मागील काही दिवसात अतिवृष्टी झालेल्या सांगली, कोल्हापूर, कराड अशा पूरग्रस्त भागात नागरिकांसाठी जीवनावश्यक मदत वाढदिवसानिमित्त पाठविण्यात आली. पंढरपूर तालुक्यात सध्या चर्चेत असलेले अभिजीत पाटील यांनी आपल्या कर्तृत्वावर परजिल्ह्यात जाऊन यशस्वीपणे तीन साखर कारखाने चालवत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्यामुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात आहे.
1 ऑगस्ट रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पिराची कुरोली, नांदोरे, देगाव, पंढरपूर याआदी गावात तसेच धाराशिव कारखाना युनिट 1,2,3 मध्ये 502 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच पळशी,पटवर्धन कुरोली, शेळवे, देगाव, शेळवे, अनवली, फुलचिंचोली या गावात मोठ्या प्रमाणात वृक्षांचे रोपण करण्यात आले. महाआरोग्य तपासणी शिबिर रायगड लॉन्स भोसे येथे आयोजित करण्यात आले.
साखर कारखानदारी, विविध उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी स्वतः यशस्वी वाटचाल करीत असताना पंढरपूर शहर व तालुक्यातील हजारो युवकांना स्वयंरोजगार व लघुउद्योगाची वाट दाखवली आहे. येथील तरुणांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य करून अर्थकारणाच्या वाटेवर यशस्वी होण्यास प्रोत्साहित केले आहे. यामुळेच राजकीय वर्तुळात देखील पाटील यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गोपाळपूर येथील वृद्धाश्रमात अन्नदान तर देवडे येथे धान्यवाटप करण्यात आले होते.