सोलापूर- मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी पंढरपूर-दादर-पंढरपूरसह आठ विशेष एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या होत्या. परंतु यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 01027 दादर -पंढरपूर एक्स्प्रेस आठवड्यातील प्रत्येक सोमवारी, शुक्रवारी आणि रविवारी धावत होती. सदर गाडी दि. 5 ते 27 सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 01028 पंढरपूर- दादर एक्स्प्रेस आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी, शनिवारी आणि सोमवारी धावत होती. सदर गाडी 6 सप्टेंबरपासून 28 सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 01041 दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी, बुधवारी, गुरूवारी आणि शनिवारी धावत होती. ही गाडी 7 ते 30 सप्टेंबरदरम्यान रद्द झाली आहे आहे. गाडी क्रमांक 01042 साईनगर शिर्डी- दादर एक्स्प्रेस आठवड्यातील प्रत्येक बुधवारी, गुरूवारी, शुक्रवारी आणि रविवारी धावत होती. ही गाडी 8 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 01131 दादर-साईनगर शिर्डी विशेष एक्स्प्रेस 8 ते 29 सप्टेंबरदरम्यान रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 01132 साईनगर शिर्डीदादर विशेष एक्स्प्रेस 9 ते 30 सप्टेंबरदरम्यान रद्द करण्यात आली आह. गाडी क्रमांक 02147 दादर-साईनगर शिर्डी विशेष एक्स्प्रेस 10 ते 24 सप्टेंबरदरम्यान रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 02148 साईनगर शिर्डीदादर विशेष एक्स्प्रेस 11 ते 25 सप्टेंबरदरम्यान रद्द करण्यात आली आहे.
प्रवाशांनी रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची माहिती घेऊन आपला पुढील प्रवास करावा आणि रेल्वेस सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वे सोलापूर विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.