“एटीएम” मध्ये जाताय.. सावधानता बाळगा, भामट्याने शिक्षकालाच लावला 89 हजाराला चुना!

सोलापूर- एटीएम केंद्रामध्ये पैसे काढण्यास गेल्यानंतर एटीएम कार्डची अदलाबदली करून एका भामट्याने एका शिक्षकाचे 89 हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत हैबत्ती आमसिद्ध वंजारे (वय 50, रा. स्वामी विवेकानंदनगर, कुमठे रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी वंजारी हे पैसे काढण्यासाठी होटगी रस्त्यावरील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये गेले असता त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या अज्ञात व्यक्तीने एटीएममधून 15 हजार रुपये निघत नाहीत, तुमच्या मोबाइलवर ओटीपी आला का बघा, असे सांगितले. त्यामुळे फिर्यादी हे त्यांच्या खिशातून मोबाइल काढून ओटीपी बघत असताना सदरच्या व्यक्तीने हातचलाखी करून फिर्यादीच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून निघून गेला. त्याने फिर्यादीच्या एटीएम एटीएम कार्डची अदलाबदल नंतर त्यांच्या बँक खात्यातून 89 हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली आहे. अधिक तपास फौजदार गायकवाड हे करीत आहेत
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!