पंढरपूर – पावसाळ्यात ज्याची चातकाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील नागरिक वाट पाहात आहेत तो मान्सून भीमा नीरा खोर्यात सक्रिय झाला असून यामुळे तेथील धरणं भरून आगामी काळात पुढे उजनी व सोलापूर जिल्ह्यात भीमा नीरा काठी पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. भीमा उपखोर्यात पाऊस सुरु झाल्याने आतापासूनच उजनीला पाणी मिळू लागले आहे. दौंडचा विसर्ग 8791 क्युसेक इतका झाला आहे.
मागील चोवीस तासात भीमा खोर्यातल मुळा मुठा व अन्य उपखोर्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यंदा पुणे जिल्ह्यात उशिरा पाऊस सुरु झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने उजनी लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण होते.