शुभवार्ता : उजनीत दौंडजवळून ४२ हजार ८८५ क्युसेकने पाण्याची आवक, धरण झपाट्याने वधारणार
पंढरपूर- मागील चोवीस तासात भीमा व नीरा खोर्यात मुसळधार पावसाची नोंद असून अनेक धरण परिसरात तसेच भीमेच्या उपनद्यांच्या पर्जन्यक्षेत्रात दोनशे ते तीनशे मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान खडकवासला धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने उजनीत दौंडजवळून येणार्या पाण्याचा विसर्ग ही आता ४२ हजार ८८५ क्युसेक असून हा महाकाय प्रकल्प आता २ टक्के उपयुक्त पातळीत भरला आहे. दौंडमधून येणारी पाण्याची आवक व पुणे बंडगार्डन विसर्ग पाहता उजनीतील पाणीसाठा झपाट्याने वधारणार आहे.
मागील चोवीस तासात भीमा खोर्यातील मुळशी टेमघर, पवना ,पानशेत, वरसगाव यासह अन्य धरणांवर तुफान पाऊस झाला असून खडकवासला प्रकल्प शंभर टक्के भरल्याने यातून २५ हजार क्युसेकपर्यंत पाणी नदीत सोडले गेले आहे, हा विसर्ग नंतर १५ हजार क्युसेक करण्यात आला आहे. यामुळे पुणे बंडगार्डनचा विसर्ग वाढला आहे. यासह भीमा नदीच्या परिसरात होत असलेला पाऊस, इंद्रायणी नदीतून येणारे पाणी यामुळे दौंडचा विसर्ग वाढत आहे.
*Ujjani Dam* :-
Daily Gauges —
Date —- 23/07/2021 at 6.00 hrs
RWL —— 491.160 m.
Water Sp.Area —199.98
Sq.km.
*-Storage-*
Gross ——- 1828.67 M Cum.
——– (64.57 TMC)
Live ——– 25.86 M Cum.
——— ( 0.91 TMC)
Live % ——– *1.70 %*
Rainfall ( Today’s / Cumulative ) ——– 00/246 mm.
Evaporation ——– 3.54 mm.
*River Gauging Station @ Daund :-*
River Water Level – 500.640 m.
Inflow Discharge – 42885 Cusecs.