पंढरपूर – भीमा व नीरा खोर्यात शुक्रवारी दिवसभर व रात्री अक्षरशः पावसाने थैमान घातले असून नीरा खोरे व मुळा मुठा उपखोर्यातील प्रकल्पांवर जोरदार पजर्र्न्यवृष्टी होत असल्याने खडकवासलामधून 18 हजार 499 तर वीरमधून 22305 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. यासह या पावसामुळे भरलेल्या सात प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
दरम्यान दौंडचा विसर्ग वाढत असल्याने उजनीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे.
उजनी धरण 13 टक्के उपयुक्त पातळीत आहे. खडकवासला प्रकल्पातून पाणी वाढविल्याने आता बंडगार्डनचा विसर्ग वाढत आहे. क्षमतेने भरलेल्या कासारसाईमधून 2100, वडिवळेतून 6294, कलमोडी 3284, आंध्रा 3280 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. यासह घोड उपखोर्यातील वडज प्रकल्पातून 505 क्युसेकचा विसर्ग आहे.
मागील चोवीस तासात मुळशीवर 201 मि.मी., पवना 120 ,टेमघर 190, वडीवळे 187, पानशेत 193, वरसगाव 188,आंध्रा 96, कलमोडी 124, भामा आसखेड 81, खडकवासला 58 मि.मी.यासह अन्य प्रकल्पांवर मध्यम व किरकोळ स्वरूपाचा पाऊस नोंदला गेला आहे.
नीरा खोर्यात ही पावसाने थैमान घातले असून गुंजवणीवर 173 तर नीरा देवघर धरणावर तब्बल 255 मि.मी. पाऊस झाला आहे. भाटघरवर 92 तर वीर प्रकल्पावर 25 मि.मी.ची नोंद आहे. येथील पावसाचे प्रमाण पाहता वीरच्या विद्युतगृहातून सुरूवातीला काल सायंकाळी 800 क्युसेकने पाणी सोडण्याचे आले होते. यानंतर हा विसर्ग 4 हजार व आता सकाळी 22 हजार 305 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
भीमा व नीरा खोर्यातील कलमोडी,आंध्रा ही धरण शंभर टक्के भरली आहेत. तर खडकवासला 94, कासारसाई 87, वडीवळे 89, पवना 72, पानशेत 76, वरसगाव 65, भामा 74, मुळशी 60, पवना 71 टक्के भरले आहे. नीरा खोर्यातील गुंजवणी 80, देवघी 79, भाटघर54 तर वीर 88 टक्के भरले आहे.