मातृप्रेम : अवघ्या 26 वर्षाच्या तरूणाने आईसाठी दिली आपली किडनी


करमाळा –  आई हे देवाचे रूप मानले जाते. तिच जन्माला घालते आणि पालन-पोषणही करते म्हणूनच मातृऋणातून कधीच उतराई होवू शकत नाही असे म्हंटले जाते. आई-वडिलांची सेवा हीच ईश्‍वरसेवा असून पंढरीत भक्त पुंडलिक मातापित्याची सेवा करत असल्याने साक्षात भगवंत श्री विठ्ठल ही त्याची 28 युगे वाट पाहात विटेवर उभे आहेत. हे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे करमाळा तालुक्यातील एका  26 वर्षीय तरूणाने आपल्या आजारी आईसाठी आपली एक किडनी तिला देवून मातृप्रेमाचे आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.

 समाधान वलटे यांच्या आईच्या म्हणजे नंदा वलटे (वय 50) यांच्या दोन्ही किडन्या निकामी  झाल्या त्या गेली दोन वर्षे डासलिसीसवर होत्या. आजारी आईचा संघर्ष सुरु असताना मुलाने  मातेसाठी आपली एक किडनी देवून मातृप्रेमाचे आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. वलटे हे उमरड (ता. करमाळा) येथील शेतकरी कुटुंब आहे. समाधान (वय 26) यांनी त्यांच्या आइ1ला आपली किडनी दिली आहे. याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नुकतीच पुणे येथील जहाँगीर रुग्णालयात यशस्वीपणे पार पडली आहे. याबाबतची शस्ऋक्रिया 21 सप्टेंबर रोजी करण्यात आली.
नंदा वलटे यांच्या किडन्या निकामी झाल्याने त्या दोन वर्षांपासून त्या डायलिसीस उपचार घेत होत्या. या काळात आरोग्याबरोबरच आर्थिक समस्यांनाही तोंड देण्याची वेळ वलटे कुटुंबावर आली होती. त्या काळात समाधान यांनी सर्व जबाबदारी उचलली. त्यांना भगिनी शीतल व त्यांचे पती किशोर गटकूळ (कालठण) तसेच इतर नातेवाईकांची बहुमोल मदत मिळाली. दरम्यानच्या काळात किडनी प्रत्यारोपणाचाच पर्याय समोर आल्यानंतर समाधान यांनी मोठ्या निर्धाराने स्वतःचीच किडनी आईसाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्व काही जुळून आले आणि 21 सप्टेंबर 2021 रोजी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
आईसाठी किडनी देण्याचा निर्णय घेणार्‍या समाधान यांच्या विवाहाला अवघे एकच वर्ष पूर्ण झालेले असून या निर्णयावेळी त्यांच्या पत्नी ऋतुजा या त्यांच्या पाठीशी राहिल्या. किडनी दिल्यानंतर व प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर वलटे कुटुंबात आनंदाचे वातावरण दिसून येत असून या घटनेने कुटुंबातील जिव्हाळा, आपलेपणा समोर आला आहे. आईसाठी किडनी देवून एकप्रकारे जीवदानच देणार्‍या समाधान यांचा आमदार महेश लांडगे यांनी विशेष सन्मानपत्र देवून गौरव केला आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!