महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढविणार : तयारी सुरू; सोलापूरमध्ये मेळावा संपन्न
सोलापूर – राज्यात येत्या काही दिवसात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका निवडणूक होणार असून त्या मनसे लढवणार असून यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन सोलापूर येथील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पक्षाचे नेते दिलीप धोत्रे यांनी केले.यावेळी सोलापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य, तसेच शेकडो युवकांनी मनसेत प्रवेश केला. राज्यभरात मनसेकडून मेळावे आयोजित केले जात आहे. या अंतर्गत सोलापूर येथील उषा लॉन्स मंगल कार्यालयात कार्यकर्ता आणि पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली होती.धोत्रे म्राहणाले , राज्यातील तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने आणि केंद्रातील भाजपा सरकारने कोरोना काळात जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. या काळात राज्य आणि केंद्र सरकारकडून सामान्यांना काहीच दिलासा मिळाला नाही. फायनान्स कंपन्या आणि बँकेकडून होणाऱ्या छळवणुकीबाबत सरकारने काहीच केले नाही. घरगुती तसेच शेतीचे वीज कनेक्शन तोडण्यात आले त्यावर ही सरकारकडून शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला नाही.केंद्र सरकारने देखील कोणतेही मदत केली नाही.खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोरोनाच्या रुग्णांना लाखो रुपये खर्च करावे लागले, याबाबत केंद्र व राज्य सरकारने काही केले नाही.त्यामुळे येत्या निवडणुकीत जनता भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,कोरोनाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेला मदत केली. पूरग्रस्तांना मदत केली त्यामुळे जनतेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भरभरून आशीर्वाद मिळेल असा विश्वास धोत्रे यांनी व्यक्त केला. यावेळी प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, अप्पा करचे, शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेखे ,उपाध्यक्ष सत्तार सय्यद,विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अमर कुलकर्णी , महिला अध्यक्ष जयश्री हिरेमठ उपस्थित होते.