एकरकमी एफआरपी न मिळाल्यास राज्यभर आंदोलन, मनसेच्या पहिल्या ऊस परिषदेत दिलीप धोत्रे यांचा इशारा


पानगाव – ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एक रकमी एफआर पी न दिल्यास महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन छेडेल जाईल असा इशारा मनसे नेते दिलीप धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे मनसेच्या पहिल्या ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एक रकमी एफआरपी मिळावी तसेच  पहिली उचल तीन हजार  तीनशे रूपये असावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. ऊस कारखान्यास दिल्यानंतर 14 दिवसाच्या आत एक रकमी एफआरपी  शेतकर्‍यांना देणे बंधनकारक असतानाही याचे तीन टप्पे करण्याचा प्रयत्न राज्य व केंद्र सरकार करत आहे. अनेक छोट्या मोठ्या घटनांवर एकमेकांशी  भांडण करणारे केंद्र व राज्य सरकार ऊस उत्पादक शेतकर्‍यांना तीन टप्प्यात एफआरपी देण्याच्या मुद्द्यावर मात्र एकत्र आली आहेत, असा आरोप धोत्रे यांनी यावेळी केला.
या ऊस परिषदेत शेतकर्‍यांना दिवसा 12 तास वीज मिळावी, बँकेने प्लेज लोन कारखानदारांच्या खात्यावर जमा न करता थेट शेतकर्‍यांना द्यावे, रोहित्र दुरुस्तीसाठी 80 टक्के वीज बिलाची अट रद्द करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी मनसे प्रदेश उपाध्यक्ष अशोक तावरे , शेतकरी संघटनेचे अरुण कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष सुमित खांबेकर, शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी मुंडे, मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष  यात डॉ. नरसिंह भिकाने, सुमंत धस, श्रीराम बदाडे, वैभव काकडे, राजेंद्र मोठे, प्रकाश साळुंखे, गजानन गीते, प्रशांत नावगिरे, राजेंद्र गपाट, मोतीसिंह जहागीरदार, रवी राठोड, गणेश सुरवसे, शेख राज, रुपेश सोनटक्के, प्रशांत गिड्डे, अप्पा करचे उपस्थित होते. 

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!