श्री विठ्ठल दर्शनाची ओढी दर्शविणारे रेल्वेच्या टपावरील भाविक गर्दीचे छायाचित्र ठरले राष्ट्रीय स्पर्धेचे आकर्षण

पंढरपूर –  श्री विठ्ठल रूखुमाईच्या दर्शनाची ओढ सार्‍यांनाच असते. यामुळेच पंढरीत नेहमी गर्दी उसळते,सध्या जरी कोरोनामुळे यात खंड पडला असला तरी मागील दोन दशकांपूर्वी पंढरीच्या यात्रा कालावधीत नॅरोगेज रेल्वेच्या टपावर तुडूंब गर्दीत दाटीवाटीने बसून भाविक पंढरीत येत असत. त्यावेळी केवळ इंजन वगळता सारे डबे हे वारकर्‍यांनी भरलेले असायचे अगर्दी टपावरही इंचभर जागा नसायची. याचे त्यावेळचे छायाचित्र 2021 च्या राष्ट्रीय छायाचित्र स्पधर्र्ेचे आकर्षण ठरले आहे. ते टिपले होते पंढरपूरचे पत्रकार आणि उत्कृष्ठ छायाचित्रकार सुनील उंबरे यांनी.


फोटो सर्कल सोसायटी, मुंबई व ठाणे महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ठाणे महापौर राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेसाठी जवळपास 3 हजार 500 छायाचित्र आली होती यापैकी 300 निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन ठाण्यातील हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये भरविण्यात आले होते. यात सुनील उंबरे यांच्या नॅरोगेज डिझेल इंजिनच्या पंढरपूरकडे येणार्‍या वारीतील रेल्वेचे वारकर्‍यांनी खचाखच भरलेले छायाचित्र गाजले असून यास  कांस्य पदक प्राप्त झाले असून ते ठाण्याच्या उपमहापौर पल्लवी कदम यांच्या हस्ते श्री. सुनील  व सौ. हेमाताई उंबरे यांना प्रदान केले. पदक व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
नुकताच हा पुरस्कार वितरण सोहळा ठाणे येथे पार पडला.  यावेळी व्यासपीठावर महापौर नरेश मस्के, स्थायी समितीचे सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वळकी, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. माधवी नाईक, नगरसेविका नम्रता फाटक, नगरसेविका मीनल संख्ये आदी उपस्थित होते.कृष्णधवल छायाचित्रण विभागात उंबरे यांच्या प्रवाशांनी भरगच्च भरलेली रेल्वे या छायाचित्राला नामांकन होते. ही स्पर्धा बावीस वर्षांपासून भरविली जाते.


पंढरपूरला ब्रॉडगेज रेल्वे सुरू होण्यापूर्वी हे स्टेशन मिरज- लातूर या इंग्रजकालीन बार्शीलाईट रेल्वेचा भाग  होते. 1990 च्या दशकापर्यंत या तीनशे किलोमीटरच्या मार्गावर कोळश्यावर चालणारे इंजिन गाडी ओढायचे. मात्र 1990 च्या अगोदर येथे डिझेल इंजिनचा उपयोग होवू लागला मात्र हा मार्ग नॅरोगेजच होता. यामुळे या गाडीचा वेळ जास्त नसायचा. सात ते आठ डब्यांची गाडी असायची. याचे तिकिट कमी असल्याने यातून प्रवासही परवडायचा म्हणून भाविक या गाडीचा वापर लातूर व मिरज भागातून येण्यासाठी करायचे. यात्रा कालावधीत डब्यांच्या टपावर भाविक दाटीवाटीने बसायचे. आषाढी वारीत तर या गाड्या भरगच्च भरलेल्या असायच्या. याचे हे छायाचित्र आहे. नंतरच्या काळात पंढरपूर ते कुर्डूवाडी हा मार्ग ब्रॉडगेज झाला व हळूहळू पंढरपूर- मिरज व कुर्डूवाडी- लातूर ही ब्रॉडगेजने जोडले गेले.
सुनील उंबरे यांच्या या कृष्ण धवल छायाचित्राने पंढरपूरकरांबरोबरच त्या काळाचे साक्षीदार असणार्‍या अनेकांच्या डोळ्यासमोर ती भाविकांनी भरलेली भरगच्च रेल्वे तरळली. उंबरे हे हौशी छायाचित्रकार असून वाइल्डलाइफ फोटोग्राफी त्यांचा छंद आहे. ते सामना दैनिकाचे प्रतिनिधी आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!