पंढरपूर – उजनी धरणात दौंडजवळून मिसळणारा पाण्याचा विसर्ग शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता 2115 क्युमेक म्हणजेच जवळपास 74 हजार क्युसेक इतका झाला होता. यामुळे धरण झपाट्याने वधारून ६ टक्के उपयुक्त पातळीत पोहोचले आहे. उजनीला भीमा खोर्यातील पावसाचा फायदा होत आहे. काल सायंकाळी धरण उपयुक्त पातळीत भरण्यास सुरुवात झाली आहे. खडकवासला प्रकल्पातून सोडण्यात येणारे पाणी बंक्षकेल्याने पुणे बंडगार्डन चा विसर्ग 532 क्युमेक म्हणजे 20 हजार क्युसेक इतका कमी झाला आहे. मात्र इंद्रायणी व अन्य उपनद्यांवर होत असलेला पाऊस उजनीला फायदा पोहोचवत आहे.
दरम्यान नीरा खोर्यात होत असलेल्या पावसामुळे वीर धरणातून 800 क्युसेक पाणी वीज निर्मिती साठी सोडण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण पाहता निरेवरील धरण लवकर भरुन यातून जास्त पाणी सोडण्याची वेळ येवू शकते. आजही नीरा भागात पाऊस आहे. यामुळेच आगामी काळात वीरचा विसर्ग वाढू शकतो हे पाहता नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.