पंढरपूर – पुणे जिल्ह्यात भीमा व उपनद्यांवर होत असलेल्या पावसामुळे उजनीत येणारी दौंडजवळूनची पाण्याची आवक ६९ हजार ३३९ क्युसेक झाली असून धरण वेगाने भरत १८.३२ टक्के उपयुक्त पातळीत भरले आहे.
धरणातमागील दोन दिवसात १० टीएमसी पाणी आले आहे। दौंडजवळून येणारे पाणी पाहता प्रकल्प आणखी वेगाने वधारेल. पुणे बंडगार्डन चा विसर्ग खडकवासला धरणातून पाणी सोडणे कमी केल्याने २१ हजार क्युसेक आहे.