वीर धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता, नदीकाठी सावधानतेचा इशारा


पंढरपूर – वीर धरण सोमवार १३ रोजी सप्टेंबर आज सकाळी ९.०० वाजता ९५.६८ टक्के भरले असून धरण परिसरात पावसाचे प्रमाण व पाण्याची आवक वाढत असल्याने पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नीरा नदीपात्रामध्ये सोमवारी दुपारी १२ नंतर केव्हाही पाणी सोडण्यात येईल याची नदीकाठच्या सर्वांनी नोंद घ्यावी. नदी पात्रात कोणीही जाऊ नये असा इशारा नीरा धरण व्यवस्थापनाने दिला आहे.

दरम्यान नीरा खोर्‍यात पावसाची हजेरी असून गुंजवणी 33, देवघर 59, भाटघर 26 तर वीरवर 24 मि.मी. पावसाची नोंद आहे. भाटघर व देवघर धरण भरले असल्याने यातून पाण्याचा विसर्ग पुढे वीरकडे येत आहे. नीरा खोर्‍यातील गुंजवणी, देवघर व भाटघर धरण शंभर टक्के भरली असून वीर ही 93 टक्के भरले आहे. हे धरण भरल्यानंतर यातून ही पाणी सोडले जाईल. सध्या भाटघर 5600 तर देवघर मधून 3500 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.  

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!