अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हिरव्यागार दुर्वांनी सजले

पंढरपूर – मागील काही महिन्यांपासून पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात सण, यात्रा, उत्सव व राष्ट्रीय दिनी विविध फुलांची आकर्षक आरास करण्यात येत आहे व यास भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक भाविक ही सेवा बजावण्यासाठी पुढे येवू लागले आहेत. मंगळवारी 2 मार्च रोजी अंगारकी चतुर्थीला मंदिरात श्री गणरायाच्या प्रिय हिरव्यागार दुर्वांची आरास करण्यात आली आहे. सदरची आरास सेवा पुण्याचे भाविक सचिन चव्हाण यांनी बजावली आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!