स्तुत्य उपक्रम : निराधार विद्यार्थ्यांचे पालकत्व काळे शैक्षणिक संकुलाने स्वीकारले


पंढरपूर – कोरोना कालावधीमध्ये अनेकांचे पालकत्व हरवले अशा विद्यार्थ्यांना मायेचा आधार देऊन शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी वसंतराव काळे शैक्षणिक संकुलाने राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी व्यक्त केले.
ते वाडीकुरोली येथील वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात कोरोनामुळे आई वडिलांचे दुर्दैवी निधन झाल्याने निराधार झालेल्या  विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांना शालेय साहित्य व इयत्ता बारावीपर्यंत दरमहा 1 हजार रुपये आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेल्या वसंतदादा काळे शैक्षणिक पालकत्व योजनेप्रसंगी बोलत होते ते म्हणाले ,भावनिकतेपेक्षा संवेदनशीलता महत्त्वाचे असून ती समाजोपयोगी प्रत्यक्ष उपक्रमातून कृतीतून दिसून येते याच सामाजिक बांधिलकीतून हा आदर्श उपक्रम होतआहे.  
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याण काळे हे होते. काळे म्हणाले, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून वसंतदादा काळे यांच्या प्रेरणेतून आजपर्यंत  उज्वल शैक्षणिक वाटचाल चालू आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहून संस्थेने वेगवेगळे उपक्रम राबवून आधार दिला आहे कोरोनामुळे ज्यांचे पालकत्व हरपले आहे अशा  सर्व विद्यार्थ्यांना मायेचा आधार देण्यासाठी शैक्षणिक साहित्याबरोबरच भरीव आर्थिक मदत दिली जाणार आहे.
यावेळी दिनकर चव्हाण सुधाकर कवडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे त्यांनी केले. यावेळी  महादेव नाईकनवरे ,रावसाहेब देशमुख, युवा गर्जनाचे अध्यक्ष समाधान काळे ,राजाभाऊ माने ,विजय कदम ,जुलूस शेख, नवनाथ माने, माजी संचालक हनुमंत सुरवसे, वसंतदादा मेडिकल फाउएंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुधीर शिनगारे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.समाधान काळे व संजय कुलकर्णी  यांनी केले तर आभार मुख्यध्यपक अनिल कौलगे यांनी मानले


अशी आहे योजना..
शैक्षणिक संकुलाच्या वतीने राबवलेला राज्यातील पहिला उपक्रम असून  वसंतदादा काळे पालकत्व योजनेच्या माध्यमातून संस्थेत शिक्षण घेत असलेल्या पाचवी ते बारावी , आयटीआय ,नर्सिंगपर्यंतचा संपूर्ण खर्च , शैक्षणिक साहित्य व मुलांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरमहा 1 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!