अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचा १० वी चा निकाल ९७.९० टक्के
संतोष भोसले
अकलूज — मार्च २०२० मध्ये झालेल्या इयत्ता १०वी च्या माध्यमीक शालांत परीक्षेत येथिल शिक्षण प्रसारक मंडळातील ३३ शाखेतून २८५९ विद्यार्थी परीक्षेला बसले.त्या पैकी २७९९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन संस्थेचा निकाल ९७.९० टक्के लागला.
संस्थेच्या जिजामाता कन्या प्रशालेतील सहा मुलींनी संस्थेत प्रथम येण्याचा मान पटकावला.या मध्ये कु.प्रणिता मोहन मिटकल हिने ९९.२० टक्के व कु.किरण कालिदास मगर हिने ही ९९.२० टक्के मिळवीत प्रथम क्रमांक मिळवला. तर कु.प्रीती दिलीप कागदे हिने ९८.८० टक्के मिळवीत व्दितीय व कु.शेजल प्रमोद शेटे, कु.देविका हरिश्चंद्र मगर,कु. आलिषा सिकंदर शेख या तिघींनी ९८.४० टक्के समान गुण मिळवीत तृतीय क्रमांक पटकाविला.
संस्थेच्या श्री गणेश विद्यालय पिंपळनेर,जिजामाता कन्या प्रशाला अकलूज,श्री.जयसिंह मोहिते पाटील वि.संग्रामनगर,श्री.विजयसिंह मोहिते वि.वाघोली,श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील वि.कोथरुड,लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर, संत तुकाराम विद्यालय बोंडले, कृष्णानंद विद्यामंदिर पाटीलवस्ती,श्रीनाथ वि.लोंढे मोहितेवाडी, कर्मवीर बाबासाहेब पाटील वि. सदाशिवनगर , श्री सावतामाळी वि. माळेवाडी , श्री.विजयसिंह मोहिते पाटील वि.कोळेगाव, महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर अशा १३ शाखांचा निकाल १००टक्के लागला.
सदाशिवराव माने विद्यालय (९८.७९), मोरजाई वि.मोरोची (९८.७२),श्री हनुमान वि.लवंग(९८.७०),श्री पवसेश्वर वि.पळसमंडळ (९७.७३),श्रीमती र.मो.पा.प्र व ज्यूनी काॕ.नातेपुते(९७.६२),श्री शंभू महादेव वि.उंबरे दहिगाव(९७.५६),श्री.बाणलिंग वि.फोंडशिरस (९६.६३),श्री.संभाजीबाबा वि. इस्लामपूर (९६.४३),श्री.चक्रेश्वर वि.चाकोरे (९५.८३),प्रतापसिंह मोहिते पाटील वि.शिवपूरी (९५.३५), स.म. शंकरराव मोहिते पाटील वि. वेळापूर (९५.०८), अकलाई वि.अकलूज (९५.००), सदाशिवराव माने वि.माणकी (९३.५९), श्री.विजसिंह मोहिते पाटील वि.विझोरी (९३.५५),श्रीमती र.मो.पा.वि. मांडवे(९२.९८), श्री समर्थ रामदास विद्यामंदिर शिवथर (९१.६७),रामलिंग वि.कुरबावी (९०.००), श्री.काळभैरव वि.गुरसाळे (८४.३२),मोहनराव पाटील वि. बोरगांव (८०.००),राञ प्रशाला अकलूज (७५.००) निकाल लागला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील,संचालक संग्रामसिंह मोहिते पाटील,संचालिका कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील,सचिव आभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील,सर्व प्रशाला समीतीचे पदाधिकारी,मुख्याध्यापक आदींनी अभिनंदन केले आहे.