अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदतीचे राज्यपालांना साकडे

मुंबई- भाजपा नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांची आज सकाळी राजभवन येथे भेट घेतली व अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी केली. याबाबत लगेच कारवाई करण्याचे राज्यपाल महोदयांनी मान्य केले आहे.मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो. या निधीचे संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावे. एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, अशी विनंती फडमवीस यांनी केली. राज्यपाल महोदयांनी यावर सुद्धा तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!