अयोध्येतील श्री राममंदिरासाठी अभिजित पाटील यांनी दिला एक लाख रू. निधी

पंढरपूर, दि. 19- श्रीराम जन्मभूमी अयोध्येत साकारणार्‍या भव्य मंदिरासाठी पंढरपूर येथील उद्योजक व डिव्हीपी समुहाचे प्रमुख अभिजित पाटील यांनी सहभाग नोंदवून एक लाख रूपयांचा निधी देवू केला आहे.
सध्या श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीत मंदिराच्या उभारणीचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरु असून तीन वर्षाच्या कार्यकाळात ते बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहे. अतिभव्य असा या मंदिराच्या बांधकामासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. यासाठी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांसाठी निधी समर्पण अभियान राबविण्यात येत आहे.
पंढरपूर येथील सुप्रसिद्ध व दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले युवा नेते अभिजित पाटील यांनी देखील या अभियानामध्ये सहभागी होत एक लाख रुपयांचा निधी तत्काळ देवू केला आहे. भव्य अशा ऐतिहासिक कार्यात आपणही खारीचा वाटा उचलून पावन व्हावे, तसेच पंढरपूरचा एक सामान्य नागरिक म्हणून सर्व पंढरपूरवासियांच्या वतीने माझा भाव श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यासाठी या अभियानात सहभागी होत असल्याची भावना त्यांनी यावेळी बोलून दाखविली.
पंढरपूर येथील नागरिकांच्या वतीने श्री. अभिजित पाटील यांच्या या कार्यासाठी मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!