आमदार भारत भालके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार  

पंढरपूर, दि. २८ : पंढरपूर-मंगळवेढा विधासभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके (६० वर्षे) यांच्या पार्थिवावर सरकोली येथे आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामाम अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा भगिरथ भालके यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला.

आमदार भारत भालके यांचे काल रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे पार्थिव आज दुपारी पंढरपूर येथे आणण्यात आले. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पंढरपूर येथे नागरिकांनी गर्दी केली होती. पंढरपूर येथे सरगम चौक, सावरकर चौक, शिवाजी चौक, प्रदक्षिणा मार्ग, कालिका देवी चौक यामार्गे त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. विठ्ठल सहकारी साखर कारखाना (गुरसाळे ता.पंढरपूर) व मंगळवेढा येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

सरकोली येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार भालके यांना आदरांजली वाहिली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रशांत परिचारक, संजय शिंदे, यशवंत माने, प्राणिती शिंदे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार दीपक साळुंखे, नारायण पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, उदयसिंह भोसले, तहसिलदार वैशाली वाघमारे, स्वप्निल मरोड, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्यासह सहकार, राजकीय क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. अंत्यसंस्कारावेळी पोलीसांच्या वतीने हवेत तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

One thought on “आमदार भारत भालके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार  

  • April 13, 2023 at 4:49 am
    Permalink

    The assignment submission period was over and I was nervous, bitcoincasino and I am very happy to see your post just in time and it was a great help. Thank you ! Leave your blog address below. Please visit me anytime.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!