उद्योगपतींची कर्ज माफ होतात, मग बचतगटाच्या महिलांची का नाही ?: दिलीप धोत्रे
पंढरपूर- मोठ्या उद्योगपतींची जर कर्ज माफ होत असतील तर ज्या महिलांनी यापूर्वी सर्व कर्ज बिनबोभाट भरली आहेत मात्र आता कोरोनाकाळात त्यांचे व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्या भगिनींना कर्जमाफी मिळणे गरजेचे आहे. त्यांनी कर्ज भरताना जो विमा उतरविला होता याची सर्टिफिकेट मिळाली पाहिजेत. व्यवसायावर संकट असतान विमा लागू होत नसेल तर इतकी वर्षे या नावाखाली गोळा केलेली रक्कम कुठे गेली असा सवाल मनसचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी विचारला आहे.
कोरोनाच्या महामारीत बचतगट कर्ज हप्ते भरणे महिलांना अशक्य झाल्याने त्यांचे कर्ज माफ करून मिळावे या मागणीसाठी मनसेने येत्या मंगळवारी दि . 29 सप्टेंबर रोजी पंढरपूर तहसील कार्यालयावर महिलाचा मोर्चा काढण्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी पंढरपूर शहर आणि तालुक्यातील सर्व महिला आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मंगळवार सकाळी दहा वाजता उपस्थित रहावे असे आवाहन मनसेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे यांनी केले आहे.
महिलांनी बचत गटाचे कर्ज घेताना आपल्या कर्जातून विमा रक्कम काढून दिली आहे. तो विमा असे संकट आल्यावर लागू केला जातो, परंतु विमा रक्कम काढून घेऊन त्याचे सर्टिफिकेट मात्र बचत गटांना मिळालेले नाही ,त्यामुळे या कोरोनाच्या परिस्थितीत विमा लागू करणे अशक्य झाले आहे. सध्या या कोरोनाकाळात व्यवसाय बुडाले ,साहित्याची नासाडी झाली यामुळे महिलांना आता नव्याने व्यवसाय उभा करणे अवघड झाले आहे. तरी सरकारने यामध्ये योग्य मार्ग काढून अडचणीत आलेल्या महिलांना दिलासा देऊन नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी सरकारकडे करण्यात येत आहे. यासाठीच या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील अनेक वर्षांपासून ही बचत गट वसुली अतिशय काटेकोरपणे केली आहे. सध्या आर्थिक परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे कर्जमाफी एवढाच एक मार्ग शिल्लक असून या मागणीसाठी होणाऱ्या या भव्य मोर्चात विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन धोत्रे यांनी केले आहे. यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,महेश पवार, कृष्णा मासाळ,सिध्देश्वर गरड, निकीता पवार, पूजा लावंगकर, प्रताप भोसले, अवधूत गडकरी, आकाश बंदपट्टे, रोहन पंढरपूरकर, नागेश इंगोले उपस्थित होते.
I like this web blog very much, Its a really nice situation to read and receive info . “Education is the best provision for old age.” by Aristotle.