करकंबचे कोरोना तपासणी अहवाल आले १ पॉझिटिव्ह , ३८ निगेटिव्ह
पंढरपूर- तालुक्यातील करकंब येथे बुधवारी कोरोनाग्रस्त आढळला होता. त्यांच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. याचा अहवाल आला असून त्यापैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून उर्वरित ३८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
करकंब येथे बाहेरगावाहून आलेल्या व संस्थात्मक विलगीकरणातील ठेवलेल्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला होता. यानंतर करकंब व परिसरातील ३९ लोकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते.
शहर व तालुक्यात आता एकूण ७ कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान आरोग्य विभागाने पंढरपूर, उपरी , गोपाळपूर तसेच चळे येथील ४७ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. याचे अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आले आहेत.
तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्था अहोरात्र झटत आहे. तालुक्यात बाहेरुन आलेल्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. या नागरिकांनी स्वत:च्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी जबाबदारीने वागावे. सर्वच नागरिकांनी आपल्या घरातील 65 वर्षावरील व्यक्ती आणि 10 वर्षाखालील मुलांची काळजी घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी केले आहे.
I believe this website contains some really wonderful info for everyone : D.
I genuinely appreciate your work, Great post.
I haven?¦t checked in here for a while as I thought it was getting boring, but the last few posts are good quality so I guess I?¦ll add you back to my daily bloglist. You deserve it my friend 🙂