कोरोनामुक्तीसाठी महिलांचाही पुढाकार महत्वाचा : प्रांताधिकारी सचिन ढोले

प्रत्येक कुटूंबातील प्रमुखांनी दक्षता घेण्याची गरज

पंढरपूर दि. ,19– तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संकटावर मात करण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा असून, कुटूंबातील प्रमुख व्यक्ती कामानिमित्त सतत बाहेर जात असल्याने संपूर्ण कुटूंब बाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे. हे पाहता कुटूंबातील महिलांनी जागरुक राहून याबाबत दक्षता घ्यावी, त्यावर आवश्यक उपाययोजना कराव्यात ,असे आवाहन प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे खूप गरजेचे आहे. कुटूबांतील एखाद्या व्यक्तींचा कामानिमित्त बाहेरील व्यक्तींशी संपर्क आल्याने त्या व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्या व्यक्तींचा कुटूंबातील इतर व्यक्तींशी संपर्क आल्याने संपूर्ण कुटूंब बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा त्रास जास्तीत-जास्त कुटूंबातील जेष्ठ नागरिक व लहान मुलांना होत आहे. यासाठी बाहेर जाण्याऱ्या नागरिकांनी अधिक दक्षता घ्यावी. प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या .सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी समाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर व स्वच्छता या त्रिसूत्रीचा वापर करावा. आणि या आजाराचा प्रसार होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे श्री. ढोले यांनी सांगितले.
तालुक्यात लवकरात लवकर रुग्णांचे निदान व्हावे, त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम केल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे लक्षणे आढळून आल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत. संसर्ग होणार नाही यासाठी आवश्यकती खबरदारी घेत नियमांचे पालन करावे. जेणेकरुन आपल्यासह सर्वांचा जीव वाचण्यासाठी कोरोनाची लढाई यशस्वी करु असेही श्री.ढोल यांनी सांगितले.
कोरोनाचा संसर्ग तोडण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात प्रतिबंधित क्षेत्रास सर्व परिसरांमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण तसेच करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेवून आरोग्य यंत्रणांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने सर्व खासगी रुग्णालये सुरु करावीत.त्या ठिकाणी सर्व रुग्णांची तपासणी व औषधोपचार करावेत अशा सूचनांही प्रांताधिकारी ढोले यांनी दिल्या.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!