किसान क्रेडिट कार्ड योजनेची शिवामृतकडून प्रभावीपणे अंमलबजावणी :धैर्यशील मोहिते पाटील

अकलूज– केंद्र सरकारने सुरू केलेल्या शेतकरी हिताच्या योजनेचा फायदा दूध उत्पादक शेतक-यांना व्हावा म्हणून शिवामृत दूध संघाच्या माध्यमातून किसान क्रेडिट योजना माळशिरस तालुक्यात प्रभावीपणे राबविण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे ,असे शिवामृत दूधसंघाचे चेअरमन व भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

देशात कोराना विषाणूचा प्रार्दुभाव वाढलेला असून दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतक-याला खेळते भांडवली कर्ज उपलब्ध होते.

या अंतर्गत दूध उत्पादकांना व्यवसाय करताना जनावरे निरोगी राहून त्यापासून चांगले गुणप्रतीचे दूध पुरवठा करणेसाठी आवश्यक असणारे पशूखाद्य, चारा खरेदी, औषध उपचारासाठी व इतर खर्चासाठी मदत व्हावी या हेतूने ही योजना प्रभावीपणे राबविणेत येणार आहे.

यासाठी साठी किसान क्रेडिट फॉर्म भरुन त्यासोबत आधार कार्ड, ७/१२, ८ अ खाते उतारा, बँक पासबुक झेरॉक्स, दोन फोटो शिवामृत संघाकडे दि.२७/०७/२०२० पर्यंत जमा करावेत. असे आवाहन करण्यात आले आहे.

किसान क्रेडिट कार्ड फॉर्म शिवामृत संघाचे www.shivamrut.com या वेबसाईटवर व ऑफिसमध्ये उपलब्ध असून सदर योजनेचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी घ्यावा असे आवाहन ही धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले यावेळी व्हा.चेअरमन सावता ढोपे, कार्यकारी संचालक रवीराज इनामदार देशमुख, सेक्रेटरी प्रदीप पवार यांच्यासह संचालक व अधिकारी उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!