कोणतेही गट-तट एकत्र येवू द्यात..मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी : भगिरथ भालके

पंढपूर – कोणतेही गट-तट एकत्र येवू द्यात काही फरक पडणार नाही कारण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील जनता माझ्या सोबत आहे. येथील सर्वसामान्यांचा आशीर्वाद पाठीशी आहे, असे प्रतिपादन पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांनी केले.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील पानीवकर उपस्थित होते. भालके म्हणाले , राज्यात महाविकास आघाडी चांगले काम करत असून येथेही सर्व सहकारी पक्ष एकत्र आहोत. आमचे सर्व नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. येथे आमच्या सहकारी पक्षातील ज्यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांची भेट घेवून मी चर्चा करणार आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!