कोरोनाविरोधातील लढाईत तरूणांचे योगदान,  नरवीर तानाजी मंडळाकडून काढा वितरण

पंढरपूर, दि 22- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन धावपळ करत असून त्यांना सहकार्य करण्यासाठी स्थानिक ठिकाणची तरूणाई पुढे आली असल्याचे चित्र आहे. पंढरपूरमध्ये मागील काही दिवसांपासून रूग्णसंख्या वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक भागात आता प्रतिबंधात्मक उपाय केले जात असून रोगप्रतिकारशक्ती वाढविणार्‍या आर्सेनिकच्या गोळ्या व काढा वितरित केला जात आहे. अनेक नगरसेवक , समाजसेवक हे काम करत असताना आता तरूण मंडळ देखील या कामासाठी पुढे आली आहेत. छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळील नरवीर तानाजी तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील नागरिकांना आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या काढ्याचे वितरण सुरू केले आहे. या मंडळाचे सदस्य हा गरम काढा स्वतः बनवत आहेत व याचे वाटप भागातील सर्व नागरिकांना करत आहेत.
दरम्यान आयुर्वेदिक काढ्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्याने यास चांगलीच मागणी आहे. येथील काही डॉक्टर्स हा काढा तयार करून देत आहेत.
नरवीर तानाजी तरूण मंडळ हे प्रतिवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी प्रसिध्द आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, गणेशोत्सव, गणेश जयंती ते दिमाखात साजरी करतात. आता आपल्या भागातील नागरिकांना या मंडळाचे कार्यकर्ते कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ते गरम आयुर्वेदिक काढा वितरित करत असल्याचे त्यांचे कौतुक होत आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!