कोरोना प्रतिबंधक उपायांसाठी खा.निंबाळकरांनी दिला 30 लाखांचा निधी

पंढरपूर – माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या खासदार निधीतून तीस लाख रूपयांचा निधी कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांसाठी देवू केला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असून यासाठी आरोग्य विषयक विविध उपाय योजना केल्या जात आहेत. यास निधीची आवश्यकता आहे. हे पाहता निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांसाठी प्रत्येक पाच लाख रूपये खासदार निधी कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांसाठी देवू केला आहे. यात माण खटाव, फलटण कोरेगाव , माळशिरस, सांगोला, माळशिरस व माढा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या निधीतून मास्क , सॅनिटायझर व अन्य वैद्यकीय उपकरण घेण्यात यावीत असे त्यांनी सूचविले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!