कोरोना प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षा वेळापत्रक जाहीर होणार

*विद्यापीठांमध्ये टेस्टिंग लॅब सुरू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सूचना*

* विद्यापीठ आणि महाविद्यालय परीक्षेच्या नियोजनासाठी समिती गठीत*

मुंबई, दि.6 – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीकक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज जाहीर केले.
आज सकाळी 11:00 वाजता राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

श्री. सामंत म्हणाले, विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटीसेल कडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करून घेण्यात येथील. या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएनडीटी विद्यापीठांचे कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन असा अहवाल तयार करून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आणि मंत्री यांना सादर करतील त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही श्री. सामंत यांनी संगितले.

*विद्यापीठात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मल्टीपर्पज लॅब सुरू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या सूचना*

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आकृषी विद्यापीठांमध्ये विविध प्रकारच्या आजारा संदर्भातील चाचण्या घेता येतील अशा स्वरूपाच्या मल्टिपर्पज लॅब विद्यापीठांमध्ये सुरू करण्याच्या सूचनाही श्री.सामंत यांनी आज दिल्या.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अशा प्रकारची लॅब सुरू केली आहे. यासाठी केंद्र शासन,राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात येथील याच पार्श्वभूमीवर राज्यातील इतर विद्यापीठांनी आपल्याकडे अशा प्रकारच्या लॅब सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व परवानग्या देण्यात येतील अशी ग्वाही श्री. सामंत यांनी दिली.

*आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनएसएस विद्यार्थ्यांचीही मदत*

आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनएसएस विद्यार्थ्यांचीही मदत घेता येईल का याचा सर्व विद्यापीठाने विचार करावा. काही दिवसांपूर्वी सोलापूर विद्यापीठाने आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एक प्रयोग सुरू केला आहे. एनएसएसच्या 27 विद्यार्थ्यांना
आईवडिलांकडून परवानगी घेऊन
त्यांना प्रशिक्षण देऊन आरोग्यसेवेच्या यंत्रणेसाठी सज्ज केले. याच धर्तीवर राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये सुद्धा एनएसएसचे
विद्यार्थी आरोग्य यंत्रणेच्या सेवेसाठी घेता येतील का या साठीचा अहवाल सादर करावा आशा सूचनाही सामंत यांनी कुलगुरूंना केल्या.

*मुंबई विद्यापीठाकडून ऑनलाईन समुपदेशन (काउन्सेलिंग) आणि मानसिक आरोग्य सेवेला सुरूवात*

कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यांना चिंता, अनिश्चितता, निराशा, सामाजिक विलगीकरण आणि असुरक्षितपणाचा सामना करणे कठीण जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील लोकांच्या मानसिक आरोग्यावर आणि धोक्यामध्ये वावरणाऱ्या लोकसंख्येवर कोरोनाचा प्रभाव नोंदवून त्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेऊन केव्हिड १९ च्या उद्रेकाच्या मानसिक परिणामास सामोरे जाण्यासाठी विद्यापीठाच्या उपयोजित मानसशास्त्र विभागाने ऑनलाइन मानसिक आरोग्य सहाय्य सेवा उपलब्ध करुन दिली आहे. ही समुपदेशन सेवा वेब-आधारित स्वरूपात दिली जात आहे.
विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विवेक बेल्हेकर यांनी ही ऑनलाईन समुपदेशनाची संकल्पना आखली आहे. विभागातील सर्व प्राध्यापक समुपदेशन कार्यक्रमाचा भाग असून, डब्ल्यूएचओ, एपीए आणि अन्य व्यावसायिक मार्गदर्शक तत्त्वे वापरून विभागाने एक केव्हिड १९ समुपदेशन प्रोटोकॉल विकसित केला आहे. आशा प्रकारे इतर विद्यापीठांनी ही सुविधा सुरू करावी असेही श्री. सामंत यांनी यावेळी संगितले

*मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19*

कोविड 19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून करोनाच्या वैश्विक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले योगदान म्हणून
राज्यातील सर्व विद्यापीठातील कर्मचारी/ अधिकारी त्यांचे एक दिवसांचे वेतन कोविड 19 च्या निराकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचे आवाहन ही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री सामंत यांनी केले आहे.

*खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.*
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300

*मराठीत-*
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

सर्व खाजगी विद्यापीठांची व्हिडिओ कॉन्फरन्सही लवकरच घेण्यात येईल असेही श्री. सामंत यांनी यावेळी संगितले.
या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उच्च तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, राज्यातील 13 विद्यापीठांचे कुलगुरू, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने,सीईटी सेल चे आयुक्त संदीप कदम, मुंबईतील जे. जे. स्कुल ऑफ आर्टचे संचालक राजीव मिश्रा सहभागी होते.

9 thoughts on “कोरोना प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षा वेळापत्रक जाहीर होणार

  • April 9, 2023 at 9:45 pm
    Permalink

    Excellent website. Plenty of useful information here. I am sending it to a few friends ans also sharing in delicious. And certainly, thank you in your sweat!

  • April 11, 2023 at 12:51 pm
    Permalink

    After examine a few of the blog posts in your web site now, and I truly like your method of blogging. I bookmarked it to my bookmark website list and can be checking back soon. Pls check out my website as nicely and let me know what you think.

  • April 11, 2023 at 1:30 pm
    Permalink

    I have been examinating out a few of your posts and i can state clever stuff. I will definitely bookmark your site.

  • April 23, 2023 at 6:50 am
    Permalink

    Hi! Someone in my Facebook group shared this site with us so I came to look it over. I’m definitely loving the information. I’m book-marking and will be tweeting this to my followers! Exceptional blog and fantastic design and style.

  • May 3, 2023 at 12:56 am
    Permalink

    WONDERFUL Post.thanks for share..more wait .. …

  • May 6, 2023 at 5:39 am
    Permalink

    I like what you guys are up also. Such smart work and reporting! Carry on the excellent works guys I’ve incorporated you guys to my blogroll. I think it will improve the value of my web site :).

  • June 9, 2023 at 7:06 pm
    Permalink

    Its such as you read my thoughts! You seem to understand a lot about this, such as you wrote the ebook in it or something. I think that you simply could do with some percent to power the message house a bit, however instead of that, this is fantastic blog. A great read. I’ll certainly be back.

  • June 17, 2023 at 6:28 pm
    Permalink

    An interesting discussion is worth comment. I think that you should write more on this topic, it might not be a taboo subject but generally people are not enough to speak on such topics. To the next. Cheers

  • August 24, 2023 at 12:55 pm
    Permalink

    I have recently started a website, the information you provide on this website has helped me tremendously. Thanks for all of your time & work. “A creative man is motivated by the desire to achieve, not by the desire to beat others.” by Ayn Rand.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!