कोरोना योद्ध्यांच्या सन्मानासाठी परिचारक – भालके – आवताडे एकाच व्यासपीठावर

राजकारणाच्या पलीकडेही ‘ माणुसकीचा धागा ‘ मजबूत : आ प्रशांत परिचारक
पंढरपूर – कोरोना महामारीच्या संकटाने माणुसकी शिकवली आणि याचा गौरव करण्यासाठी भालके – परिचारक आणि अवताडे यांना एकाच धाग्यात गुंफत राजकारणाच्या पलीकडे जाऊन ‘ माणुसकीचा धागा ‘ जोडता येतो हे देखील या कार्यक्रमात वरून दिसून आले असे उद्गार आमदार प्रशांत परिचारक यांनी काढले.
बडवे समाज आणि संत प्रल्हाद महाराज प्रतिष्ठानच्या वतीने आ. प्रशांत परिचारक, ‘ विठ्ठल ‘ साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके आणि ‘ दामाजी ‘ कारखान्याचे चेअरमन समाधान अवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना योद्ध्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर ह.भ.प. राणा महाराज वासकर , विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी , प्रतिष्ठानचे श्री अनिरुद्ध बडवे , अनंत बडवे, वैभव बडवे आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी सुमारे 72 योद्ध्यांचा सत्कार आ. परिचारक , भालके आणि अवताडे यांच्या हस्ते करण्यात आला .
समाधान आवताडे यांनी सांगितले की , कोरोनामुळे झालेले नुकसान भरून येण्यासाठी आता अधिक उमेदीने आणि गतीने अर्थकारण आणि समाजजीवन प्रवाहीत होण्याची गरज आहे , अशा सन्मानामुळे ही गती अधिक वाढेल .
भगीरथ भालके यांनी सांगितले की , कोरोना हा एक आयुष्याला मिळालेला धडा होता आणि यातून समाजजीवनातील एकोपा किती गरजेचा आहे हे समोर आले.
विठ्ठल जोशी यांनी सांगितले , कोरोनाचे संकट संपलेले नाही परंतु योध्या आता विस्मृतीत जात आहे सातत्याने योध्याचे हे उपकार समाजासमोर ठेवण्यासाठी हे विसरू न देण्याची जबाबदारी या समाजाची आहे , या दृष्टीने असे सत्कार सोहळे सातत्याने आणि सदैव घडले पाहिजेत .
अध्यक्षीय भाषणात ह.भ.प. वासकर यांनी सांगितले , वारकरी संप्रदायाचे फार मोठे योगदान या महामारीच्या संकट निवारण्यासाठी झाले . देवाची आणि वारकऱ्यांची भेट टाळून विरहात्मक योगदान देखील वारकर्‍यांनी दिले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिरूद्ध बडवे यांनी तर सूत्रसंचालन वैष्णवी बेणारे यांनी केले . आभार वैभव बडवे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुभाष बडवे , दर्शन बडवे , श्रीराम बडवे यांनी परिश्रम घेतले
उपेक्षित घटकांचाही सन्मान
कोरोना योद्ध्यांचे सत्कार सोहळे अनेक झाले परंतु अगदी खालच्या स्तरावर प्रत्यक्ष राबणारे अनेक घटक दुर्लक्षित राहिले होते , अशा सर्वांना एकत्रित करून यावेळी सन्मानित करण्यात आले याबद्दल अनेक वक्त्यांनी समाधान व्यक्त केले .
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!