कोरोना रुग्ण आढळल्याने पंढरपूर , गोपाळपूर , करकंबमध्ये प्रतिबंधित क्षेत्र घोषित

पंढरपूर.दि.28 : पंढरपूर तालुक्यात बुधवारी पाच रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी तालुक्यातील ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत ती तीन ठिकाण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिले आहेत.

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहेत. तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहरातील दोन कोरोना बाधित रुग्णांना वाखरी येथील एमआयटी कॉलेज मध्ये संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते. कोरोना विषाणूच्या प्रसार होवू नये यासाठी कोरोना बाधित रुग्णांकडून दुसऱ्या व्यक्तीस संसर्ग होऊ नये शहरातील ज्ञानेशवर नगर झोपडपट्टी भागातील नागरिक कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याची शक्यता असल्याने सदर भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. शहरातील अर्बन बँक ते इंदिरा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक ते सावरकर चौक, सावरकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच शिवाजी चौक ते अर्बन बँक या सीमा क्षेत्रातील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागातील हॉस्पिटल, औषध दुकाने व दूध विक्री केंद्रे वगळता इतर सेवा पुढील आदेश होई शपर्यंत बंद राहतील असे आदेशात नमूद केले आहे.

तसेच पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील संस्थात्मक विलगीकरण करणात असलेला नागरिक कोरोना बाधित आढल्याने, गोपाळपूर गावठाण परिसर केंद्रस्थानी धरुन त्यापुढील तीन किलो मीटर परिसरारातील सर्व सीमा बंधद करण्यात आल्या आहेत. तसेच सात किलो मीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याचबरोबर मौजे करंकब येथेही कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने करकंब गावठाण केंद्रस्थानी धरुन त्या पुढील तीन किलो मीटरचा परिसरातील सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच सात किलो मीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याचे प्रांतधिकारी ढोले यांनी आदेशात नमूद केले आहे.

तालुक्यात घोषित करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. घराच्या बाहेर पडू नये. जेणेकरुन आपल्यामुळे दुसऱ्या नागरिकांना त्रास होईल असे वर्तन करु नये. रेड झोन मधून आलेल्या नागरिकांनी होम क्वारंटाइनचे योग्य पालन करावे तसेच बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची शेजाऱ्यांनी त्वरित माहिती प्रशासनास द्यावी असे आवाहनही श्री. ढोले यांनी केले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!