कोरोना विरुद्धच्या लढाईतील पोलीस योध्दांना आपत्ती सेवा पदकाने गौरविले जाणार

मुंबई दि १६ – कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यात सर्वत्र अगदी ग्राम पातळीपर्यंत पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निभावले आहे त्या सर्व पोलिसांचा यथोचित सन्मान सत्कार आपत्ती सेवा पदक देऊन करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील पोलीस दल गेल्या तीन महिन्यापासून राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच जनमानसात सुरक्षा व सामाजिक बांधिलकी रहावी याकरिता अहोरात्र कार्यरत आहेत.लोकांच्या सुरक्षा पासून सुरक्षिततेपर्यतची सर्व कामे पोलीस करीत आहेत. लाँकडाऊन मध्ये लोकांना अगदी मास्क लावा असे समजावून सांगण्यापासून ते सामाजिक अंतर राखण्यास प्रवृत्त करण्यापर्यंतची सर्व कामे पोलिसांना करावी लागली. परप्रांतीय कामगारांना पाठवण्यात मोठ्या प्रमाणात पोलिसांना कार्य करावे लागले.

हे सर्व करत असताना पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना संसर्ग झाला. त्यासही न डगमगता आपल्या पोलीस बांधवांनी आपले कर्तव्य सुरूच ठेवले. दुर्दैवाने आपल्या ४२ पोलिस बांधवांना यात वीरगती प्राप्त झाली.
राज्यातील पोलीस बांधवांना सन्मानित करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी गृह विभागातर्फे *आपत्ती सेवा पदक* देऊन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान व गौरव करण्यात येणार असल्याचे श्री. देशमुख यांनी म्हटले आहे.

13 thoughts on “कोरोना विरुद्धच्या लढाईतील पोलीस योध्दांना आपत्ती सेवा पदकाने गौरविले जाणार

Leave a Reply

Your email address will not be published.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!