कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर, मालेगाव आणि अहमदनगर येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांची नेमणूक

मुंबई, दि. 19 : राज्यातील अहमदनगर,मालेगाव आणिसोलापूर शहरात कोविड -19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने यातिन्ही ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांची नेमणूक करण्याची विनंती सार्वजनिक आरोग्यविभागाकडून करण्यात आली होती. यानुसार या तिन्ही ठिकाणी वैद्यकीय शिक्षणविभागामार्फत तज्ञ पथकांची नेमणूक करण्यात करण्यात आली आहे अशी माहिती वैद्यकीयशिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

मुंबईतील ग्रॅण्ट मेडिकलकॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची सांगली येथे कोविड -19 नियंत्रणासाठी यापूर्वीच नेमणूक करण्यात आली होती. सांगली जिल्ह्यात कोविड-19 प्रसारास चांगले यश आले आहे.आता डॉ. पल्लवी सापळे आणिऔरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कम्युनिटीमेडिसीन विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. भारत चव्हाण हे अहमदनगर येथे जाऊन कोविड -19 च्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपचार पद्धती बरोबरच तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत.

धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातीलकम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रोफेसर डॉ. श्रीराम गोसाई आणि याच महाविद्यालयातीलसर्जरी विभागाचे प्रोफेसर डॉ. अजय सुभेदार हे मालेगाव येथे जाऊन कोविड -19 च्या नियंत्रणाचे काम पाहतील. अहमदनगर आणिमालेगाव प्रमाणेच सोलापूर शहरातील कोविड -19 ची वाढती संख्यालक्षात घेता सोलापूर महापालिका आयुक्तांच्या विनंतीनुसार सोलापूर येथीलडॉ.वैशंपायन मेमोरियल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूरआणि याच महाविद्यालयातील मेडिसिन विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. प्रसाद यांचीसोलापूर येथील कोविड -19 नियंत्रणासाठी उपचार आणि तांत्रिकसल्ला देण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. ही तज्ज्ञ डॉक्टरांची पथके तातडीनेकार्यभार स्वीकारणार असून कोविड -19 ला आळा घालण्यासाठीसंबंधित यंत्रणांना मार्गदर्शन करणार आहेत अशी माहितीही वैद्यकीय शिक्षणमंत्रीअमित देशमुख यांनी दिली आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!