क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जो जाणतो तोच उत्तम ज्ञानी : विनायक महाराज चौगुले
श्री क्षेत्र आळंदी दि . २४ – मानवाचा देह हे परमेश्वराचे मंदिर आहे. हे एक क्षेत्र आहे आणि त्याला जाणणारा क्षेत्रज्ञ होय . क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जो यथार्थपणे जाणतो तोच उत्तम ज्ञानी असतो असे ह. भ. प. बंडू उर्फ विनायक महाराज चौगुले यांनी सांगितले .
आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ व माय एफ एम इंडिया रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर दररोज सायंकाळी ४ वाजता ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरुपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आज ( गुरुवार ) तेराव्या दिवशी कोची जि कोल्हापूर येथील बंडू उर्फ विनायक महाराज चौगुले यांनी प्रकृतिपुरुषविवेकयोग या तेराव्या अध्यायावर सुरेख निरुपण केले .
तरि क्षेत्र येणें नांवे l हे शरीर जेणे भावे ll
म्हणितले ते आघवे l सांगो आता ll
चौगुले महाराज म्हणाले , देह हा नश्वर आहे . या देहात जो पर्यंत आत्मा आहे तो पर्यंतच त्याचे मुल्य आहे . आत्मा निघून गेला की त्या देहाला क्षणभरही कोणी घरात ठेवत नाही . हे विश्व म्हणजे क्षेत्र होय तर या क्षेत्राचे पालन करणारा पांडुरंग परमात्मा हा क्षेत्रज्ञ होय . यंदा आषाढी वारी रद्द झाल्याने या क्षेत्रज्ञाचे दर्शन आपणाला दुर्लभ झाले आहे . त्यासाठी मानसपूजा , आराधना नामस्मरण करुन या परमात्म्याला आपलेसे करा . पंढरीचा वारकरी कधी ज्ञान विज्ञानाच्या मागे लागत नाही . त्याला शाश्वत सुख कुठे भेटते हे माहित असल्याने तो श्रध्देने पांडुरंगाचे स्मरण करतो .
आंधळ्या पांगळ्याचा एकच विष्णुदाता आणि तो म्हणजे पांडुरंग होय . संतांचा सहवास लाभला की परमेश्वर प्राप्ती होते . साखर कोठेही व कशातही असली तरी आपला गुणधर्म बदलत नाही . तसे ज्ञानेश्वरीचे आहे . ती वाचकाला कायम ग्रंथरुपातुन साखरेची गोडी अनुभवावयास देते. शरीरामध्ये जो पर्यंत चैतन्य आहे तो पर्यंतच परमार्थ आहे. एकदा चैतन्य संपले की सर्वकाही संपते . ज्याच्याकडे समत्व भाव आहे त्याची दृष्टी निकोप असते. असा समत्व भाव ठेवणारा भक्त भगवंताला प्रिय असतो. या कार्यक्रमाचे निवेदन ह. भ. प. स्वामीराज भिसे यांनी केले .
उद्या शुक्रवार दि . २६ जून रोजी येथील कृष्णा महाराज चवरे हे सायंकाळी ४ वाजता ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर श्री ज्ञानेश्वरीच्या ” गुणातीतयोग ” या चौदाव्या अध्यायावर निरुपण करतील .
दरम्यान आज ( गुरुवार ) पहाटे श्री क्षेत्र आळंदी येथे आजोळघरी श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांची विधीवत पूजा , अभिषेक व आरती पालखी सोहळा प्रमुख योगेश महाराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आली. यज्ञेश्वर जोशी व राहुल जोशी यांनी पूजेचे पौरोहित्य केले . रात्री डांगे पंचमंडळी यांच्या वतीने कीर्तनाची सेवा तर रात्री नांदेडकर दिंडीच्या वतीने जागराची सेवा करण्यात आली .
https://bit.ly/3kXOOaI
https://tinyurl.com/2nltjyar
dizayn cheloveka telegram
My spouse and I stumbled over here coming from a different website and thought I may as well check things out.
I like what I see so now i’m following you. Look forward
to looking at your web page for a second time.
Good day very nice web site!! Guy .. Beautiful .. Amazing .. I will bookmark your website and take the feeds additionally?KI am glad to seek out numerous useful info here in the post, we want develop extra strategies on this regard, thank you for sharing. . . . . .