खासगी रुग्णालयांच्या तपासणीसाठी पाच जणांचे विशेष पथक नियुक्त , जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

सोलापूर, दि. 27- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विविध प्रतिबंधात्मक उपाय राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यातील एक भाग म्हणून सोलापूर शहरातील सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी पाच जणांच्या एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. यासाठी वेगवेगळ्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. सध्या शहरातील काही खासगी रुग्णालय व दवाखाने बंद असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे कोरोना आजारांचे रुग्ण वगळून इतर आजारी रुग्णांना उपचार मिळण्यास अडचण निर्माण होत होत्या. त्याचा भार शासकीय रुग्णालयांवर वाढत होता.

अपघात, प्रसूती, मधुमेह, किडनीचा आजार, हृदयविकार, मणक्यांचे, हाडांचे आजार, पॅरालिसीस इत्यादी रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार न करता इतरत्र जाण्यास सांगण्यात आले होते. शहरात स्त्रीरोग व प्रसुती रुग्णालय बंद असल्याने आरोग्यसेवा देण्यात अडथळा होत होता. त्यामुळे शहरातील सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालय, मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यवसायिक, औषधे दुकाने आणि संबंधित आरोग्यविषयक खासगी आस्थापना सुरू आहेत का नाहीत, त्यांच्याकडे दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी किंवा ज्या रुग्णांना वैद्यकीय सेवेची गरज आहे, त्यांना खासगी रुग्णालयात वैद्यकीय सुविधा देत आहेत का नाहीत, याची सविस्तर तपासणी करणे आवश्यक होते. यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पाच जणांचे पथक नियुक्त केला असल्याचा आदेश दिला आहे.

उज्वला सोरटे पथक प्रमुख

मंद्रूपच्या अप्पर तहसीलदार उज्वला सोरटे पथक प्रमुख आहेत. डॉ. ज्ञानेश्वर सोडल, वैद्यकीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका, श्री परदेशीमठ नायब तहसीलदार, मंगळवेढा, श्रीराम कुलकर्णी, परवाना अधीक्षक सोलापूर महानगरपालिका व तुकाराम घाडगे सपोनि, आर्थिक गुन्हे शाखा यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

­‘आयएमए’कडून रुग्णालयांचे

हेल्पलाइन क्रमांक जाहीर

­

सोलापूर, दि. 27- शहरातील नॉन कोविड रुग्णालयांची यादी आणि रुग्णालयाचे हेल्पलाइन क्रमांक इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्याकडून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सादर करण्यात आले.

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आयएमएच्या प्रतिनिधींना सूचना केल्या होत्या. सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालय व दवाखाने सुरू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आयएमएकडून शहरातील रुग्णालयांची यादी व हेल्पलाइन क्रमांक जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले आहे. आयएमएचे अध्यक्ष डॉ. हरीश रायचूर आणि सोलापूर हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुदीप सारडा यांनी यादी सादर केली आहे.

­­­

हॉस्पिटलची नावे आणि हेल्पलाईन क्रमांक

* सर्व स्पेशालिटी:

* अश्विनी हॉस्पिटल- 0217-2319900/5, संपर्क व्यक्ती: 9552555041

* मार्कंडेय सहकारी रुग्णालय- 0217- 2452018

* यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल- 0217-2323001/2

* अस्थिरोगतज्ज्ञ:

* कोठाडिया नर्सिंग होम- 9689999711,

शाश्वत हॉस्पिटल- 0217-2727057/ 8551887057

* येमुल ऑर्थोपेडिक सेंटर- 9172836652/ 3550006

* मोनार्क हॉस्पिटल- 7721800018

* न्यूरोलॉजी:

* एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स- 9823714872/ 9175988840

* सी एन एस हॉस्पिटल- 0217-2728877/ 9322088000

* बालरोगतज्ज्ञ:

* स्पेन हॉस्पिटल- 0217-2728033

* चिरायू मुलांचे हॉस्पिटल- 0217-2620800

* शाश्वत हॉस्पिटल- 0217-2727057/ 8551887057

* जनरल सर्जरी: मोनार्क हॉस्पिटल- 7721800018

* स्त्रीरोगतज्ज्ञ- डॉ. रुंदा चौधरी- 9849633578/ 9423869563

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!