गुरुवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 149 रुग्ण वाढले , 145 जण झाले कोरोनामुक्त

सोलापूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) गुरुवारी 3 डिसेंबर रोजी एकूण 149 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 42 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 145 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रगुरूवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 2 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता दिवाळीनंतर काही तालुक्यात वाढताना दिसत आहे. तर या आजारावऱ मात करून घरी परतणार्‍यांची संख्या ही मोठी आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 35889 इतकी झाली असून यापैकी 33208 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 1634 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 145 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 1047 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 4 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 42 रूग्ण वाढले
पंढरपूर– गुरुवारी 3 डिसेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 15 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 27 असे 42 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7 हजार 395 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 216 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 1 जण मयत आहे. सध्या एकूण 552 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 6627 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .

6 thoughts on “गुरुवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 149 रुग्ण वाढले , 145 जण झाले कोरोनामुक्त

  • March 17, 2023 at 1:55 am
    Permalink

    Hey! Quick question that’s entirely off topic. Do you know how to make your site mobile friendly? My blog looks weird when viewing from my apple iphone. I’m trying to find a template or plugin that might be able to fix this problem. If you have any suggestions, please share. Cheers!

  • April 15, 2023 at 2:25 am
    Permalink

    I’m curious to find out what blog platform you have been utilizing? I’m having some minor security issues with my latest blog and I’d like to find something more secure. Do you have any suggestions?

  • May 4, 2023 at 10:04 am
    Permalink

    When I originally commented I clicked the “Notify me when new comments are added” checkbox and now each time a comment is added I get three emails with the same comment. Is there any way you can remove me from that service? Thanks a lot!

  • August 25, 2023 at 4:17 pm
    Permalink

    Hi there very nice site!! Man .. Excellent .. Superb .. I will bookmark your site and take the feeds alsoKI’m satisfied to search out numerous useful information right here in the post, we want work out extra strategies on this regard, thanks for sharing. . . . . .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!