गुरूवारी पंढरपूर तालुक्यात 8 कोरोना रूग्ण वाढले, एकाचा मृत्यू
पंढरपूर – गुरूवार 11 मार्च रोजी आलेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 64 कोरोनाबाधितांची भर पडली असून पंढरपूर शहरात चार तर तालुक्यात 4 अशा आठ जणांची नोंद आहे. आज येथे एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
सोलापूर ग्रामीणमध्ये गुरूवारी सर्वाधिक रूग्ण बार्शी तालुक्यात 13 तर यापाठोपाठ करमाळा 12 , माढा 10 तर पंढरपूरमध्ये आठ जणांची नोंद आहे. जिल्हा ग्रामीणचा विचार केला येथे 41 हजार 292 रूग्ण आजवर आढळून आले असून 1195 जण या आजारात दगावले आहेत. सध्या 696 जणांवर उपचार सुरू आहेत तर 39 हजार 401 जण या आजारातून बरे झाले आहेत.
I adore gathering useful information , this post has got me even more info! .